Utkat Sadhuni Sheela
उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी
लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी
देह अहंभाव रावण निवटोनी
जय देव जय देव
जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा
जय देव जय देव
प्रथम सीता शोधी हनुमंत गेला
लंका दहन करुनी अखया मारिला
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला
आनंदाची गुढी घेऊनिया आला
जय देव जय देव
जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा
जय देव जय देव
निजबळे निजशक्ति सोडविली सीता
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा
आनंदे ओसंडे वैराग्य भरता
आरती घेऊनी आली कौसल्यामाता
जय देव जय देव
जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा
जय देव जय देव
अनहतध्वनि गर्जती अपार
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार
अयोध्येसी आले दशरथकुमार
नगरीं होत आहे आनंद थोर
जय देव जय देव
जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा
जय देव जय देव
सहजसिंहासनी राजा रघुवीर
सोऽहंभावे तया पूजा उपचार
सहजांची आरती वाद्यांचा गजर
माधवदास स्वामी आठव ना विसर
जय देव जय देव
जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा
जय देव जय देव