Tujhya Krupene Din Ugave Ha
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
तुझ्या कृपेने दिन उगवे हा करुनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना
वंदितो तुजला गजवदना
सिंदुर वदना तुजला नमितो दर्शन दे मजला
सुखकर्ता तू दु:ख हरोनिया तारी प्रभु सकळा
विघ्नविनाशक म्हणती तुजला
विघ्नविनाशक म्हणती तुजला तू आमची प्रेरणा
वंदितो तुजला गजवदना
वंदितो तुजला गजवदना
सर्व सुखाचा तू प्रभुदाता
सर्व सुखाचा तू प्रभुदाता विद्येच्या देवा
जनजीवनी तुच शुभकरा शुभदिन फुलवावा
कर्पुगौरा गणनायक तू
कर्पुगौरा गणनायक तू गाऊनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना
वंदितो तुजला गजवदना
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
तुझ्या कृपेने दिन उगवे हा करुनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना
वंदितो तुजला गजवदना
वंदितो तुजला गजवदना