Pancharati
घेउनि पंचारती
करुं बाबांसी आरती
करुं साई सी आरती
करुं बाबांसी आरती
उठा उठा हो बांधव
ओंवाळूं हा र माधव
सांई र माधव
ओंवाळूं हा र माधव
करुनीयां स्थीर मन
पाहूं गंभीर हें ध्यान
साईंचें हें ध्यान
पाहूं गंभीर हें ध्यान
कृष्णनाथा दत्तसाई
जडो चित्त तुझे पायीं
चित्त देवा पाहीं
जडो चित्त तुझे पायीं