Ovalito Kakad Aarti
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती
भक्तजन येऊनिया दारी उभे स्वामीराया
चरण तुझे पहावया तिष्ठती अती प्रीती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती
भक्तांच्या कैवारी समर्था निरधारी
भेट घेऊन चरणावरी गातो आम्ही तुझी स्तुती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती
पूर्णब्रम्ह देवाधिदेवा निरंजनी तुझा ठावा
भक्तासाठी देहभाव धवीसी तु विश्वपती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती
स्वामी तुची कृपाघन ऊठुन देई दर्शन
स्वामीदास चरण वंदी मागतसे भावभक्ती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती