Marutichi Aarti Sattrane Uddhane
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं
कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्रीहनुमंता
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता
जय देव जय देव
दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द
थरथरला धरणीधर मानिला खेद
कडाडिले पर्वत उड़गण उच्छेद
रामी रामदास शक्तीचा बोध
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्रीहनुमंता
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता
जय देव जय देव