Majhe Chitt Tujhe Paayi
Sant Tukaram
माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही
धरोनिया बाही भव हा तारी दातारा
चतुरा तु शिरोमणी गुण लावण्याची खाणी
चतुरा तु शिरोमणी गुण लावण्याची खाणी
करी या तिमिराचा नाश उदय होऊनी प्रकाश
तोडी आशा पाश करी वास हृदयी
चतुरा तु शिरोमणी गुण लावण्याची खाणी
चतुरा तु शिरोमणी गुण लावण्याची खाणी
पाहे गुंतलो नेणता माझी असो तुम्हा चिंता
तुका ठेवी माथा पायी आता राखावे
चतुरा तु शिरोमणी गुण लावण्याची खाणी
चतुरा तु शिरोमणी गुण लावण्याची खाणी