Dhany Dhany Ho Prakshina
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती
मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
कोटि ब्रह्महत्या हरिती करितां दंडवत
कोटि ब्रह्महत्या हरिती करितां दंडवत
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि
अनुभव ते जागति जे गुरुपदिचे अभिलाषी
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची