Bhimarupi Maharudra

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें
सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका
दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका
ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें
ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं
सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी
कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे
मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें
आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे
अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे
तयासी तुळणा कोठें मेरु मांदार धाकुटे
ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे
आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा
धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकळा गुणें
ऐसे हे स्त्रोत माहात्म्य पधती जपती सदा
मारुतीच्या प्रसादाने मुक्ती भक्ती सदा बसे
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती
इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम्

Músicas mais populares de अजित कडकडे

Outros artistas de