Aata Swami Sukhe Nidra

आ आ आ आ आ आ
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता
नरसिंव्ह सरस्वती अवधूता
चिन्मय सुखधामी जाउनी पहुडा एकांता
चिन्मय सुखधामी जाउनी पहुडा एकांता स्वामीराया
वैराग्याचा कुंचा घेवूनी चौक झाडीला
स्वामी चौक झाडीला
तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला
तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला स्वामीराया
पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती
स्वामी नवविधा भक्ती
ज्ञानाच्या समया उजळूनी लाविल्या ज्योती
ज्ञानाच्या समया उजळूनी लाविल्या ज्योती स्वामीराया
भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला
हृदयाकाशी टांगिला
मनाची सुमने करुनी गेले शेजेला
मनाची सुमने करुनी गेले शेजेला स्वामीराया
द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले
गुरुने एकत्र केले
दुर्बुध्दीच्या गाठी सोडूनी पडदे सोडले
दुर्बुध्दीच्या गाठी सोडूनी पडदे सोडले
आशा तृष्णा कल्पनेचा सांडूनी गलबला
गुरु हा सांडूनी गलबला
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला स्वामीराया
अलक्ष उन्मन सेवूनी स्वामी नाजूक हा शेला
गुरु हा नाजूक हा शेला
निरंजन सदगुरु स्वामी निजे निजेला
निरंजन सदगुरु स्वामी निजे निजेला
निरंजन सदगुरु स्वामी निजे निजेला
आ आ आ आ आ आ
आ आ आ आ आ आ

Músicas mais populares de अजित कडकडे

Outros artistas de