Aarti Gyanraja
आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा
आरती ज्ञानराजा
लोपलें ज्ञान जगी
हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग
नाम ठेविले ज्ञानी
आरती ज्ञानराजा
कनकाचे ताट करी
उभ्या गोपिका नारी
नारद तुंबर हो
साम गायन करी
आरती ज्ञानराजा
प्रकट गुह्य बोले
विश्र्व ब्रम्हाची केलें
रामजनार्दनी
पायी मस्तकी ठेले
आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा
आरती ज्ञानराजा