Thakle Re Nandlala

Sudhir Phadke, G D Madgulkar

नाच नाचुनी अती मी दमले
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला

निलाजरेपण कटीस नेसले निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व जडविला भाला
उपभोगाच्या शतकमलांची
उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
थकले रे नंदलाला

विषयवासना वाजे वीणा अतृप्ती दे ताला
अनय अनीती नुपूर पायी कुसंगती कर ताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी
लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला

स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना सादही गोठून गेला
अंधारी मी उभी आंधळी
अंधारी मी उभी आंधळी जीव जीवना भ्याला
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
थकले रे नंदलाला

Curiosidades sobre a música Thakle Re Nandlala de Asha Bhosle

De quem é a composição da música “Thakle Re Nandlala” de Asha Bhosle?
A música “Thakle Re Nandlala” de Asha Bhosle foi composta por Sudhir Phadke, G D Madgulkar.

Músicas mais populares de Asha Bhosle

Outros artistas de Pop rock