Raat Suhani
रात सुहानी ही
झाले दिवानी मी
तुझ्या सहवासात
मदमस्त झाले मी
अंगी अंगी स्पर्श दे ना
मंद वारा तुझ्या प्रितीचा
लुटू दे ना लम्हा लम्हा
हल्का हल्का या रातीचा
थोडया नषेने थोडया मस्तीने
रात रंगू दे ना
हाय
रात सुहानी ही
झाले दिवानी मी
हो हे मंद मंद सांज सरताना
हि धुंद धुंद रात फुलताना
वेडावत रे अशी मी
भास तुझा होऊन मी बावरते
बेभान या मनास मी आवरते
आवरू रे किती मी
तुझ्या विना मनोमनी मी झुलते
रात सारी कोरीच डोळ्यात उरते
आहा ओहो अहं
रात सुहानी ही
झाले दिवानी मी
झाले मी बेताल नषेत
सावर रे तुझ्या मिठीत
जवळ घे तू असे की
श्वासातुनी श्वास हे गुंफावे
माझ्यात तु तुझ्यात मी गुंतावे
गोड क्षण हे गुलाबी
ह्रिदयात हे कायमचे गुंफावे
तुझ्याच रे नशेत मी राहावे
आहा ओहो अहं
रात सुहानी ही
झाले दिवानी मी
तुझ्या सहवासात
मदमस्त झाले मी
अंगी अंगी स्पर्श दे ना
मंद वारा तुझ्या प्रितीचा
लुटू दे ना लम्हा लम्हा
हल्का हल्का या रातीचा
थोडया नषेने थोडया मस्तीने
रात रंगू दे ना
हाय
रात सुहानी ही
झाले दिवानी मी ला ला ल ला ला ला ल ला