Mee Hi Ashi Bholi Kashi Ga
मीही अशी भोळी कशी ग
मीही अशी भोळी कशी ग
भोळी खुळी
मी लाजले
जे मना वाटले
ते राहिले माझ्याचपाशी
मीही अशी
मी जाणिले ना मनी काय आले
एका कळीचे कसे फूल झाले
अंग अंग माझे नवे रूप ल्याले
अंग अंग माझे नवे रूप ल्याले
डोळ्यांमध्ये चांदणे धुंद ओले
आले कुठे मी स्वप्नदेशी
मीही अशी भोळी कशी ग
मीही अशी
ओठांत आले मुके गुज बाई
मला बावरीला सुचेनाच काही
भरे कंप देही झुके पापणीही
भरे कंप देही झुके पापणीही
शब्दांविना अंतरी सूर गाई
ते गुंजते आता स्वतःशी
मीही अशी भोळी कशी ग
भोळी खुळी
मी लाजले
जे मना वाटले
ते राहिले माझ्याचपाशी
मीही अशी