Manat Nasata Kahi Gade

P Savlaram, Viswanath More

मनात नसता काही गडे
मनात नसता काही गडे
का प्रीत तयावर तुझी जडे
का प्रीत तयावर तुझी जडे
मनात नसता काही गडे
मनात नसता काही गडे

मंदिरात मी हात जोडिता
मंदिरात मी हात जोडिता
अनोळखी तो जवळी येता
अनोळखी तो जवळी येता
बघता बघता हरवुन जाता
बघता बघता हरवुन जाता
का नेत्रपाखरू तुझे उडे
का नेत्रपाखरू तुझे उडे
मनात नसता काही गडे

किंचित ह्सता किंचित फसता
किंचित ह्सता किंचित फसता
रूप देखणे प्रीत लाजता
रूप देखणे प्रीत लाजता
विसरेना ते विसरू जाता
विसरेना ते विसरू जाता
का उघड्या नयनी स्वप्न पडे
का उघड्या नयनी स्वप्न पडे
मनात नसता काही गडे

शतजन्माचे बंधन बांधुन
शतजन्माचे बंधन बांधुन
हिरवे कंकण करात घालुन
हिरवे कंकण करात घालुन
प्रीत तिकडची कुंकु लाविता
प्रीत तिकडची कुंकु लाविता
का हळदीचे ते ऊन पडे
का हळदीचे ते ऊन पडे
मनात नसता काही गडे
मनात नसता काही गडे
का प्रीत तयावर तुझी जडे
मनात नसता काही गडे

Curiosidades sobre a música Manat Nasata Kahi Gade de Asha Bhosle

De quem é a composição da música “Manat Nasata Kahi Gade” de Asha Bhosle?
A música “Manat Nasata Kahi Gade” de Asha Bhosle foi composta por P Savlaram, Viswanath More.

Músicas mais populares de Asha Bhosle

Outros artistas de Pop rock