Kon Aavade Adhik Tula [Gavlan]

Shrinivas Khale, Anil Mohile, G D Madgulkar

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला रे सांग मला

आई दिसते गोजिरवाणी आई गाते सुंदर गाणी
आई दिसते गोजिरवाणी आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती बनवायाला सहज तिला
आई आवडे अधिक मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला रे सांग मला

गोजिरवाणी दिसते आई परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला
आवडती रे वडिल मला
आवडती रे वडिल मला

घरात करते खाऊ आई घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर चिंगम अन्‌ चॉकलेट तर
बाबा घेती रस्त्याला
आवडती रे वडिल मला
आवडती रे वडिल मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला रे सांग मला

कुशीत घेता रात्री आई थंडी-वारा लागत नाही
कुशीत घेता रात्री आई थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला
आई आवडे अधिक मला
आई आवडे अधिक मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला रे सांग मला

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला
आवडती रे वडिल मला
आवडती रे वडिल मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला रे सांग मला

आई सुंदर कपडे शिवते पावडर तिची तीच लावते
आई सुंदर कपडे शिवते पावडर तिची तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला
आई आवडे अधिक मला
आई आवडे अधिक मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला ग सांग मला

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला
आवडती रे वडिल मला
आवडती रे वडिल मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला रे सांग मला

बाई म्हणती माय पुजावी माणूस ती ना असते देवी
बाई म्हणती माय पुजावी माणूस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावुनी पायाला
आई आवडे अधिक मला
आई आवडे अधिक मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला ग सांग मला

बाबांचा क्रम वरती राही त्यांच्या पाया पडते आई
बाबांचा क्रम वरती राही त्यांच्या पाया पडते आई
बाबा येता भिऊन जाई सावरते ती पदराला
आवडती रे वडिल मला
आवडती रे वडिल मला

धडा शीक रे तू बैलोबा आईहुनही मोठ्ठे बाबा
धडा शीक रे तू बैलोबा आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती बाबांसंगे लग्नाला
आवडती रे वडिल मला
आवडती रे वडिल मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला
सांग मला रे सांग मला
आई आवडे अधिक मला
आई आवडे अधिक मला
आवडती रे वडिल मला
आई आवडे अधिक मला
आवडती रे वडिल मला
आई आवडे अधिक मला

Curiosidades sobre a música Kon Aavade Adhik Tula [Gavlan] de Asha Bhosle

De quem é a composição da música “Kon Aavade Adhik Tula [Gavlan]” de Asha Bhosle?
A música “Kon Aavade Adhik Tula [Gavlan]” de Asha Bhosle foi composta por Shrinivas Khale, Anil Mohile, G D Madgulkar.

Músicas mais populares de Asha Bhosle

Outros artistas de Pop rock