Dhanya Ha Savitricha Chuda
यमधर्माचा दूत कुणीही खुशाल राहो खडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
भर दरबारी पांचालीचे सत्त्व लुटावे चारित्र्याचे
भर दरबारी पांचालीचे सत्त्व लुटावे चारित्र्याचे
सखा श्रीहरी आभरणांचा अखंड घाली सडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
सती अहल्या गौतम कांता मुनीवेशाने तिला भोगिता
सती अहल्या गौतम कांता मुनीवेशाने तिला भोगिता
देवेंद्राच्या देवत्वाला तिथेच गेला तडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
यवन धावला पाठी म्हणुनी जळुनी गेली सती पद्मिनी
यवन धावला पाठी म्हणुनी जळुनी गेली सती पद्मिनी
जोहाराची कथा सांगतो अजूनि तिथला कडा
धन्य हा सावित्रीचा चुडा
धन्य हा सावित्रीचा चुडा