Kunya Deshiche Pakhru
कुण्या देशींचे पाखरूं
माझ्या अंगणात आले
कुण्या देशींचे पाखरूं
माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेसी
त्याचे पंख परदेसी
परि ओळखीचे डोळे
परि ओळखीचे डोळे
माझ्या अंगणात आले
कुण्या देशींचे पाखरूं
माझ्या अंगणात आले
माती कोठल्या धरेची
त्याच्या नखांना लागली
माया हिरवी कोणती
त्याच्या उरात सांठली
माती कोठल्या धरेची
त्याच्या नखांना लागली
माया हिरवी कोणती
त्याच्या उरात सांठली
आणि कोठले आकाश
आणि कोठले आकाश
त्याने सर्वांगा माखले
त्याने सर्वांगा माखले
माझ्या अंगणात आले
कुण्या देशींचे पाखरूं
माझ्या अंगणात आले
आ आ आ आ
कुठे पिऊन घेतले
त्याने मेघांतले जळ
कुठे पिऊन घेतले
त्याने मेघांतले जळ
दिली वाऱ्याने कोठल्या
त्याला चोचीतली शीळ
त्याच्या लकेरीत गाणे
त्याच्या लकेरीत गाणे
कुण्या जन्मींचे भेटले
कुण्या जन्मींचे भेटले
माझ्या अंगणात आले
कुण्या देशींचे पाखरूं
माझ्या अंगणात आले
माझ्या ओंजळीचे झाले मऊ घरटे राजस
त्याला न्हाऊ घालावया ओला काजळ-पाऊस
माझ्या ओंजळीचे झाले मऊ घरटे राजस
त्याला न्हाऊ घालावया ओला काजळ-पाऊस
माझे मन त्याच्यासाठी
माझे मन त्याच्यासाठी
फांदी होऊनिया झुले
माझे मन त्याच्यासाठी
फांदी होऊनिया झुले
फांदी होऊनिया झुले
माझ्या अंगणात आले
कुण्या देशींचे पाखरूं
माझ्या अंगणात आले
कुण्या देशींचे पाखरूं
माझ्या अंगणात आले
कुण्या देशींचे पाखरूं
माझ्या अंगणात आले