Lavthavti Vikrala Shiv Aarti
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां
जय देव जय देव जय श्रीशंकरा
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा
जय देव जय देव जय श्रीशंकरा
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें
त्यामाजीं अवचित हळहळ जें उठिलें
तें त्वां असुरपणें प्राशन केलें
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें
जय देव जय देव जय श्रीशंकरा
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव