Aowalu Aarti Maijha Pandharinatha
ओवांळू आरती माझ्या पंढरीनाथा
माझ्या पंढरीनाथा
दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा
दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा
काय महिमा वर्णू आतां सांगणे किती
आतां सांगणे किती
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती
राही रखुमाई दोही दो बाहीं
दोही दो बाहीं
मयूर पिच्छ चामरें ढाळिती ठायीं ठायीं
मयूर पिच्छ चामरें ढाळिती ठायीं ठायीं
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मन ती शोभा
उन्मन ती शोभा
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा
ओवांळू आरती माझ्या पंढरीनाथा
माझ्या पंढरीनाथा
दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा
दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा