Aarti Sprem
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
भक्त संकटिं नाना हो भक्त संकटिं नाना
स्वरूपीं स्थापिसि स्वधर्म स्वरूपीं स्थापिसि स्वधर्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी
हस्त तुझा लागतां हो हस्त तुझा लागतां
शंखासुरा तुझा वर देसी शंखासुरा तुझा वर देसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी
प्रल्हादाकारणें हो प्रल्हादाकारणें
नरहरि स्तंभीं गुरगुरसी नरहरि स्तंभीं गुरगुरसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी
वामनरूप धरुनी हो वामनरूप धरुनी
बळिच्या द्वारीं तिष्ठसी बळिच्या द्वारीं तिष्ठसी आरती
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला
सहावा अवतार सहावा अवतार
परशुराम प्रगटला हो परशुराम प्रगटला
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
मातला रावण सर्वां उपद्रव केला
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला
पितृवचनासाठी रामें वनवास केला
मिळोनि वानरसेना हो मिळोनि वानरसेना
राजा राम प्रगटला राजा राम प्रगटला
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले
गोपिकांचें प्रेम हो गोपिकांचें प्रेम पाहुनी
श्रीकृष्ण भुलले श्रीकृष्ण भुलले
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा
बहिरवि जान्हवी द्यावी हो बहिरवि जान्हवी द्यावी
निजसुखानंद सेवा निजसुखानंद सेवा
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
भक्त संकटिं नाना भक्त संकटिं नाना
स्वरूपीं स्थापिसि स्वधर्म स्वरूपीं स्थापिसि स्वधर्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म