Ye Ga Ramachya Banacha
जीवा शिवाची बैलजोड लाविन पैजेला आपली फुडं
डौल मोराच्या मानंचा रं डौल मानंचा
येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
तान्या सर्जाची हं नाम जोडी
तान्या सर्जाची हं नाम जोडी
कुना हुवीत हाती घोडी माज्या राजा रं
कुना हुवीत हाती घोडी माज्या राजा रं
धरती आभाळाची चाकं
त्याच्या दुनवेची वो गाडी
धरती आभाळाची चाकं
त्याच्या दुनवेची वो गाडी
सुर्व्या चंदराची वो जोडी
सुर्व्या चंदराची वो जोडी
त्याच्या सर्गाची रं माडी सर्गाची माडी
त्याच्या सर्गाची रं माडी सर्गाची माडी
डौल मोराच्या मानंचा रं डौल मानंचा
येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
सती संकराची माया
इस्नू लक्ष्मीचा राया
सती संकराची माया
इस्नू लक्ष्मीचा राया
पुरुस परकरतीची जोडी
पुरुस परकरतीची जोडी
डाव परपंचाचा मांडी माज्या राजा रं
डाव परपंचाचा मांडी माज्या राजा रं
डौल मोराच्या मानंचा रं डौल मानंचा
येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा