Tya Phoolanchya Gandh Koshi
Hridaynath Mangeshkar, Suryakant Khandekar
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
त्या प्रकाशी तारकांच्या ओटीसी तू तेज का
त्या नभाच्या नीलरंगी होउनीया गीत का
गात वायूच्या स्वरांनी सांग तू आहेस का
त्या फुलांच्या गंधकोषी
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का
आ आ वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का
त्या फुलांच्या गंधकोषी
जीवनी संजीवनी तू माउलीचे दूध का
हा जीवनी संजीवनी तू माउलीचे दूध का
कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रांत का
मूर्त तू मानव्य का रे बालकांचे हास्य का
या इथे अन् त्या तिथे रे सांग तू आहेस का
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
त्या फुलांच्या गंधकोषी