Tya Phulanchya Gandh
Hridaynath Mangeshkar, Suryakant Khandekar
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का
त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का
गात वायूच्या स्वरांनी सांग तू आहेस का
त्या फुलांच्या गंधकोषी
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का
आ आ वादळाच्या सागराचे घोर तें तू रूप का
जीवनीं या वर्षणारा तू कृपेचा मेघ का
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का
त्या फुलांच्या गंधकोषी
जीवनी संजीवनी तू माऊलीचें दूध का
हा आ जीवनी संजीवनी तू माऊलीचें दूध का
कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का
मूर्त तू मानव्य का रे बालकांचे हास्य का
या इथें अन् त्या तिथें रे सांग तू आहेस का
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
त्या फुलांच्या गंधकोषी