Dhauaj Vijayacha
अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारतात सारे
अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारतात सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे
मातीमधल्या कणाकणांतुन
मातीमधल्या कणाकणांतुन
स्वातंत्र्याचे घूमते गायन
स्वातंत्र्याचे घूमते गायन
प्रगतीचे रे पाउल पुढले संघटनेचा मंत्र जाप रे
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे
भाग्यवान ते जवान सगळे
भाग्यवान ते जवान सगळे
हसत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यस्तव मरण जिंकले मान राखला मातृभुमीचा रे
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे
इतिहासाच्या पानोपानी
इतिहासाच्या पानोपानी
बलिदानाची घूमती गाणी
बलिदानाची घूमती गाणी
धन दौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाऊ रे
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
उंच धरा रे उंच धरा रे उंच धरा रे
अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारतात सारे
अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारतात सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं
ध्वज विजयाचा उंच धरा रे हं हं हं