प्रवास

कुणा ना टळला
कुणा न कळला
जगण्याचा हा अवघड घाट
कुणी ना जाणे
वळणानंतर कुठे नेमकी सरते वाट
प्रवास प्रवास हा प्रवास
प्रवास प्रवास हा प्रवास

थकते पाऊल शिणती डोळे
रंग हि विरती आशेचे
हो पानगळीच्या वाटेवर
मन हळवे झुंबर काचेचे
हो सावल्याहि सरतात सुखाच्या
जाणणार किती हा कळेना
हो प्रवास प्रवास हा प्रवास
प्रवास प्रवास हा प्रवास

हवा वाटतो परी न मिळतो प्रेम जिव्हाळा अन सहवास
अश्या क्षणाला असे सोबती गुदमरणारा केवळ श्वास
हो प्रवास प्रवास हा प्रवास
प्रवास प्रवास हा प्रवास

Músicas mais populares de Sonu Nigam

Outros artistas de Pop