Prabhu Tu Dayalu
प्रभू तू दयाळू कृपावंत दाता
प्रभू तू दयाळू कृपावंत दाता
दया मागतो रे तुझी मी अनंता
प्रभू तू दयाळू कृपावंत दाता
प्रभू तू दयाळू
जगविण्यास देहा दिली एक रोटी
जगविण्यास देहा दिली एक रोटी
नमस्कार माझे तुला कोटी कोटी
वासना कशाची नसे अन्नचीत्ता
वासना कशाची नसे अन्नचीत्ता
दया मागतो रे तुझी मी अनंता
प्रभू तू दयाळू
तुझ्या पावलाशी लाभता निवारा
तुझ्या पावलाशी लाभता निवारा
निघे शीण सारा मिळे प्रेमधारा
सर्व नष्ट होती मनातील खंता
सर्व नष्ट होती मनांतील खंता
दया मागतो रे तुझी मी अनंता
प्रभू तू दयाळू
ज्ञान काय ठावे मला पामराला
ज्ञान काय ठावे मला पामराला
मनी शुद्ध माझ्या असे भावभोळा
तुझे नाम ओठी नको वेद गीता
तुझे नाम ओठी नको वेद गीता
दया मागतो रे तुझी मी अनंता
प्रभू तू दयाळू कृपावंत दाता
प्रभू तू दयाळू