Tu Asta Tar

P. SAVALARAM, VASANT PRABHU

तू असता तर कधी नयनांनी
अश्रू ढाळले नसते झरझर
तू असता तर तू असता तर

तू असता तर देव पुढती शरणांगत मी झाले नसते
तू असता तर देव पुढती शरणांगत मी झाले नसते
म्हटले नसते अगतिक होऊन करून कर तू या दिनेवर
तू असता तर तू असता तर

तू असता तर मात्यापित्यांचे छत्र कृपेचे ढाळले नसते
तू असता तर मात्यापित्यांचे छत्र कृपेचे ढाळले नसते
होऊन दुबळी अनाथ अशी हि बसले नसते मी उघड्यावर
तू असता तर तू असता तर

तू असता तर प्रीत तुझीही दुःखद झाली नसती कधीही
तू असता तर प्रीत तुझीही दुःखद झाली नसती कधीही
रडते तीही रडते मीही काय करू मी तू नसल्यावर
तू असता तर तू असता तर

Curiosidades sobre a música Tu Asta Tar de Lata Mangeshkar

De quem é a composição da música “Tu Asta Tar” de Lata Mangeshkar?
A música “Tu Asta Tar” de Lata Mangeshkar foi composta por P. SAVALARAM, VASANT PRABHU.

Músicas mais populares de Lata Mangeshkar

Outros artistas de Film score