Shodhu Mee Kuthe
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला
प्रीती का देई साद ही मजला
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला
ओ
ओओ
ओ दिसे कुणी मज पुन्हा लपते गं
घुमते का शीळ इथे
पदरी मी भास खुळे जपते गं
हलले काऽऽ पान तिथे
वारा हा काही सांगतो, मजला
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला
प्रिया तुला प्रिया तुला
ओ ओळखीची खूण काही पटते गं
नच झाली भेट जरी
डोळयांच्या पापण्यात, मिटते गं
उमटे जेऽ बिंब उरी
येती या चाहुली कशा मजला
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला
प्रीती का देई साद ही मजला
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला