Sang Dhavatya

P Savlaram

हो हो
सांग धावत्या जळा हो हो
सांग धावत्या जळा
तुझ्यापरी ओढ उरी तुझ्यापरी ओढ उरी
सांग कुणासी मला
हो हो सांग धावत्या जळा
हो हो सांग धावत्या जळा

लुकलुकणारी नेत्र मासळी
तुझ्या जीवनी कशी हरपली
लुकलुकणारी नेत्र मासळी
तुझ्या जीवनी कशी हरपली
मोहुनिया तिला धराया मोहुनिया तिला धराया
जीव लाविते गळा
हो हो सांग धावत्या जळा
हो हो सांग धावत्या जळा

हर्ष फुलांचे उधळित झेले
तुझे मनोगत कुठे चालले
हर्ष फुलांचे उधळित झेले
तुझे मनोगत कुठे चालले
या धरतीला कसा लागला या धरतीला कसा लागला
तुझ्या मनाचा लळा
हो हो सांग धावत्या जळा
हो हो सांग धावत्या जळा

पाणवठी या अशीच सखया
धीवरकन्या करता मृगया
पाणवठी या अशीच सखया
धीवरकन्या करता मृगया
कसा जाहला सांग प्रेमळा
कसा जाहला सांग प्रेमळा
राव शंतनु खुळा
हो हो सांग धावत्या जळा
हो हो सांग धावत्या जळा

Curiosidades sobre a música Sang Dhavatya de Lata Mangeshkar

De quem é a composição da música “Sang Dhavatya” de Lata Mangeshkar?
A música “Sang Dhavatya” de Lata Mangeshkar foi composta por P Savlaram.

Músicas mais populares de Lata Mangeshkar

Outros artistas de Film score