Paha Takile

HRIDAYNATH MANGESHKAR, SANTA SELKE

पहा टाकले पुसुनी डोळे
पहा टाकले पुसुनी डोळे
गिळला मी हुंदका
रणांगणी जा सुखे राजसा
परतुन पाहू नका
हो परतुन पाहू नका
पहा टाकले पुसुनी डोळे
गिळला मी हुंदका
रणांगणी जा सुखे राजसा
परतुन पाहू नका
हो परतुन पाहू नका

झडे दुंदुभी झडे चौघडा
झडे दुंदुभी झडे चौघडा
रणरंगाचा हर्ष केवढा हर्ष केवढा
एकदाच जन्मात लाभते
एकदाच जन्मात लाभते
ही असली घटिका
रणांगणी जा सुखे राजसा
परतुन पाहू नका
हो परतुन पाहू नका

शकुनगाठ पदरास बांधुनी
शकुनगाठ पदरास बांधुनी
निरोप देते निरोप देते
तुम्हा हासुनी
आणि लावते भाळी तुमच्या
आणि लावते भाळी तुमच्या
विजयाच्या तिलका
रणांगणी जा सुखे राजसा
परतुन पाहू नका
हो परतुन पाहू नका

या देशाची पवित्र माती
या देशाची पवित्र माती
इथे वीरवर जन्मा येती
जन्मा येती
तोच वारसा तुम्ही पोचवा
तोच वारसा तुम्ही पोचवा
येणार्‍या शतका
रणांगणी जा सुखे राजसा
परतुन पाहू नका
हो परतुन पाहू नका
पहा टाकले पुसुनी डोळे
पहा टाकले पुसुनी डोळे
गिळला मी हुंदका
रणांगणी जा सुखे राजसा
परतुन पाहू नका
हो परतुन पाहू नका

Curiosidades sobre a música Paha Takile de Lata Mangeshkar

De quem é a composição da música “Paha Takile” de Lata Mangeshkar?
A música “Paha Takile” de Lata Mangeshkar foi composta por HRIDAYNATH MANGESHKAR, SANTA SELKE.

Músicas mais populares de Lata Mangeshkar

Outros artistas de Film score