निळ्या आभाळी
निळ्या आभाळी कातरवेळी
निळ्या आभाळी कातरवेळी चांदचांदणे हसती
मी हुरहरते मनात झुरते दूर गेले पती
निळ्या आभाळी कातरवेळी
टिपूर चांदणे धरती हसते
पती पाहता मी भान विसरते
टिपूर चांदणे धरती हसते
पती पाहता मी भान विसरते
नदी समींदर नकळत मिसळूनी एकरुप होती
निळ्या आभाळी कातरवेळी
मन मंदिरी मी पूजीन त्यांना
वाहीन पायी प्रीत फुलांना
मन मंदिरी मी पूजीन त्यांना
वाहीन पायी प्रीत फुलांना
पाच जीवांच्या उजळून ज्योती ओवाळीन आरती
निळ्या आभाळी कातरवेळी चांदचांदणे हसती
मी हुरहरते मनात झुरते दूर गेले पती
निळ्या आभाळी कातरवेळी