Mala Aana Ek Hiryachi Morani

Hridaynath Mangeshkar, Shanta Shelke

माझ्या शेजारी येऊन बसता
हवं नगं काहीच ना पुसता
अगं बया आरं हट
तुम्ही नुसतेच गालात हसता
अवं गालात हसता
अगं गं गं गं
नगं फुकाची साखर पेरणी
नगं फुकाची साखर पेरणी
मला आणा एक हिऱ्याची मोरणी
हीलाआणा एक हिऱ्याची मोरणी
हीला आणा एक हिऱ्याची मोरणी

नव्या नवतीत पहिली वहिणी
पोरपणाची हौस माझी राहिली
नव्या नवतीत पहिली वहिणी
पोरपणाची हौस माझी राहिली
इतके दिवस वाट म्यां पाहिली
इतके दिवस वाट म्यां पाहिली
हा जी र जी र जी र जी र जी
जीव नुसताच लावलाय झुरणी
जीव नुसताच लावलाय झुरणी
मला आणा एक हिऱ्याची मोरणी
हीला आणा एक हिऱ्याची मोरणी
हीला आणा एक हिऱ्याची मोरणी

एक सोन्याचं कोंडण घडवा
मधे नाकाचे हिरकणी जडवा
एक सोन्याचं कोंडण घडवा
मधे नाकाचे हिरकणी जडवा
राघुनाकाचा दिमाख वाढवा आ आ हा हा
राघुनाकाचा दिमाख वाढवा आ आ जी र जी र जी र जी र जी
करून थकले तुमची मनधरनी
करून थकले तुमची मनधरनी
मला आणा एक हिऱ्याची मोरणी
हीला आणा एक हिऱ्याची मोरणी
हीला आणा एक हिऱ्याची मोरणी

Curiosidades sobre a música Mala Aana Ek Hiryachi Morani de Lata Mangeshkar

De quem é a composição da música “Mala Aana Ek Hiryachi Morani” de Lata Mangeshkar?
A música “Mala Aana Ek Hiryachi Morani” de Lata Mangeshkar foi composta por Hridaynath Mangeshkar, Shanta Shelke.

Músicas mais populares de Lata Mangeshkar

Outros artistas de Film score