Madhu Magasi Mazya
मधु मागशि माझ्या सख्या परी
मधुघटची रिकामे पडती घरी
मधु मागशि माझ्या सख्या परी
आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पाजिला तुला भरोनी
आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पाजिला तुला भरोनी
सेवा ही पूर्विची स्मरोनी
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करि न रोष सख्या दया करी
मधु मागशि माझ्या सख्या परी
नैवेद्याची एकच वाटी
आता दुधाची माझ्या गाठी
नैवेद्याची एकच वाटी
आता दुधाची माझ्या गाठी
देवपुजेस्तव ही कोरांटी
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशी तरी
मधु मागशि माझ्या सख्या परी
तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज
वृक्ष-झऱ्यांचे गूढ मधुर गुज
तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज
वृक्ष-झऱ्यांचे गूढ मधुर गुज
संसाराचे मर्म हवे तुज
संसाराचे मर्म हवे तुज
मधु पिळण्या परि बळ न करी
मधु मागशि माझ्या सख्या परी
ढळला ढळला दिन सखया
संध्या छाया भिवविती हृदया
ढळला ढळला दिन सखया
संध्या छाया भिवविती हृदया
आता मधूचे नाव कासया
आता मधूचे नाव कासया
लागले नेत्र रे पैलतिरी
मधु मागशि माझ्या सख्या परी
मधुघटची रिकामे पडती घरी
मधु मागशि माझ्या सख्या परी