Lavila Tura Phetyasi

G D MADGULKAR, VASANT SHANTARAM DESAI

लाविला तुरा फेट्यासी
युवराज तुम्ही मी हो दासी
लाविला तुरा फेट्यासी
युवराज तुम्ही मी हो दासी
बसताच उद्या मंचकी
बसताच उद्या मंचकी
विसाराल जुन्या ओळखी
विसाराल जुन्या ओळखी
विसर तो स्नेह सुखवासी हो हो
महालात जिगाचे पडदे
महालात जिगाचे पडदे
भोवती शिपाई प्यादे
भोवती शिपाई प्यादे
कोठली वाट दीनासी
युवराज अहो
युवराज तुम्ही मी हो दासी
लाविला तुरा फेट्यासी
युवराज तुम्ही मी हो दासी

मज हवी भेट राजांची राजांची
बाई तू कोण कुणाची
बाई तू कोण कुणाची
क्षण नसे वेळ आम्हासी आम्हासी

हे हास्य मोकळे असले
मी प्रथम जयाला फसले
मी प्रथम जयाला फसले
दिसणे न पुन्हा नजरेसी
युवराज अहो
युवराज तुम्ही मी हो दासी
लाविला तुरा फेट्यासी
युवराज तुम्ही मी हो दासी

येईल नवी युवराणी
अति नाजुक कमळावाणी
अति नाजुक कमळावाणी
पुसणार कोण चाफ्यासी हो हो
लाडके तुझ्यावाचोनी
मज आवडतेना कुणी
मज आवडतेना कुणी
पहिलीच भेट रमणीसी
युवराज अहो
युवराज तुम्ही मी हो दासी
लाविला तुरा फेट्यासी
युवराज तुम्ही मी हो दासी

Curiosidades sobre a música Lavila Tura Phetyasi de Lata Mangeshkar

De quem é a composição da música “Lavila Tura Phetyasi” de Lata Mangeshkar?
A música “Lavila Tura Phetyasi” de Lata Mangeshkar foi composta por G D MADGULKAR, VASANT SHANTARAM DESAI.

Músicas mais populares de Lata Mangeshkar

Outros artistas de Film score