Jyot Divyachi Mand Tevate
ज्योत दिव्याची मंद तेवते
देवघरातील देवापाशी
ज्योत दिव्याची मंद तेवते
देवघरातील देवापाशी
मीरा नाचे कृष्णासाठी
मीरा नाचे कृष्णासाठी
चित्त रंगले कृष्णापाशी
ज्योत दिव्याची मंद तेवते
देवघरातील देवापाशी
स्वप्नी ऐकते मधुर बासरी
मीरा होते क्षणी बावरी
आणि मनाने धावत जाते
हितगुज करिते श्रीरंगाशी
ज्योत दिव्याची मंद तेवते
देवघरातील देवापाशी
पाषाणातही देव पाहिले
भजनि गायनी भान हरपले
पाषाणातही देव पाहिले
भजनि गायनी भान हरपले
उपहासाने जग तिज हसले
मीरा बोले तो अविनाशी
ज्योत दिव्याची मंद तेवते
देवघरातील देवापाशी
नयनी लपले रूप सावळे
अधरी सुकले शब्द कोवळे
त्या शब्दांतून दर्शन घडले
मिठी मारली चरणापाशी
ज्योत दिव्याची मंद तेवते
देवघरातील देवापाशी
मीरा नाचे कृष्णासाठी
चित्त रंगले कृष्णापाशी
ज्योत दिव्याची मंद तेवते