Are Are Dnyana Jhalasi Pavan
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझें तुज ध्यान कळों आले
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव
फिटला संदेह अन्यतत्त्वी
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें
कोठें तुज रितें न दिसे रया
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती
घरभरी वाती शून्य झाल्या
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
वृत्तीचि निवृत्ति अपणांसकट
वृत्तीचि निवृत्ति अपणांसकट
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
निवृत्ति परमानुभव नेमा
निवृत्ति परमानुभव नेमा
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन