Aale Vayat Me

Lata Mangeshkar, P Savalaram

आले वयात मी बाळपणाची संगत सुटली
आले वयात मी बाळपणाची संगत सुटली
गोऱ्या गाली प्रीतिची लाली हो
गोऱ्या गाली प्रीतिची लाली हा लाली अवचित उठली
हा लाली अवचित उठली

निशिदिनी बाई मी मनामध्ये तळमळते बाई मी तळमळते
निशिदिनी बाई मी मनामध्ये तळमळते
ही नवखिच कसली हुरहुर मज जाळते
जीव होतो गोळा झोप नाही डोळा येतो दाटुन गळा
सख्य़ासोबतिणींची मला संगत नकोशी वाटली
गोऱ्या गाली प्रीतिची लाली गोऱ्या गाली प्रीतिची लाली हो
गोऱ्या गाली प्रीतिची लाली
हा लाली अवचित उठली हा लाली अवचित उठली

तू जिवलग माझा बाळपणातिल मैत्र
अरं मैत्र जिवलग माझा बाळपणातिल मैत्र
बोल हसुन जरा बघ फुलांत नटला चैत्र हो चैत्र हो हो हो
एका ठायी बसू गालागालांत हसू डोळा मोडून पुसू
चार डोळे भेटता दोन मने एकवटली हो हो हो
आले वयात मी बाळपणाची संगत सुटली
आले वयात मी बाळपणाची संगत सुटली

Curiosidades sobre a música Aale Vayat Me de Lata Mangeshkar

De quem é a composição da música “Aale Vayat Me” de Lata Mangeshkar?
A música “Aale Vayat Me” de Lata Mangeshkar foi composta por Lata Mangeshkar, P Savalaram.

Músicas mais populares de Lata Mangeshkar

Outros artistas de Film score