Dhadak Dhadak

आ आ आ आ
अंत का रे देवा तू पाहशी असा
उजेडात साऱ्या ह्या हरवल्या दिशा
अंत का रे देवा तू फ़ाशी असा
उजेडात साऱ्या ह्या हरवल्या दिशा
नभे दाटली उरी गोठली
दारी कोरडा ह्यो किनारा
हे देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी
देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी

अंधार पेटला जाळून या जीवा
उरात ह्यो वनवा शिनाला
उधळून खेळ हा कुणी रे लावला
तू सांग ना मला देवा
अर्ध्यावरी सुखाच्या तू खेच का पुन्हा
तू हट्ट ह्यो असा का धरला
हे देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी
देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी

काहूर माजला मनात ह्यो असा
चिरून काळजा गेला
जो घाव घातला ना ठाव रे मला
उसवून प्राण तू नेला
उध्वस्त देवळाच्या कळसापरी जसा
दगडात देव नाही उरला
देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी
देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी
देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी
देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी

Músicas mais populares de Javed Ali

Outros artistas de Pop rock