Tharar Konata
थरार कोणता तुझ्या मनी थरारला
मनात चांदवा तुझ्या कसा शहारला
तुला जरासे समीप घेतले मी
हळूच जेव्हा तुला विचारले मी
तुझा हा आरसा खरा कि सांग मी खरा
कशात पाहशील तू तुझा हा चेहरा
हे कधी कळे न कोणती आवडे मला तुझी अदा
जी आता तुझी मी पाहतो जीव होई त्यावरी फिदा
हे कधी कळे न कोणती आवडे मला तुझी अदा
जी आता तुझी मी पाहतो जीव होई त्यावरी फिदा
लागलो तुझ्या नशेत मी झुलाया
बोलती हे सारे वेडा झाला गेला वाया
थरार कोणता तुझ्या मनी थरारला
हे मनात चांदवा तुझ्या कसा शहारला
राहुनी तुझ्या सभोवती मी किती तुला न्याहाळतो
आणि मग तुला हवे तसे नेमके मी तेच बोलतो
राहुनी तुझ्या सभोवती मी किती तुला न्याहाळतो
आणि मग तुला हवे तसे नेमके मी तेच बोलतो
लागलो तुला मजेत गुणगुणाया
बोलती हे सारे वेडा झाला गेला वाया
थरार कोणता तुझ्या मनी थरारला
हे मनात चांदवा तुझ्या कसा शहारला
तुला जरासे समीप घेतले मी
हळूच जेव्हा तुला विचारले मी
थरार कोणता तुझ्या मनी थरारला
हे मनात चांदवा तुझ्या कसा शहारला
तुला जरासे समीप घेतले मी
हळूच जेव्हा तुला विचारले मी हा हा या