Varyavarti Ghet Lakeri
DASHRATH PUJARI, RAMESH ANAVKAR
वार्यावरती घेत लकेरी
वार्यावरती घेत लकेरी गात चालल्या जललहरी
वार्यावरती घेत लकेरी गात चालल्या जललहरी
वार्यावरती घेत लकेरी
चहू दिशांना प्रेमरसांकित
चहू दिशांना प्रेमरसांकित
लकेर घुमवि सुरेल संगीत
अन् संध्येच्या गाली नकळत स्वप्न रंगवी निलांबरी
वार्यावरती घेत लकेरी
ताल धरोनी हरित तृणांचे
ताल धरोनी हरित तृणांचे
मोहक पाते मुरडत नाचे
मोहक पाते मुरडत नाचे
फूल होउनी कुंदकळीचे गंध उधळिते मोदभरी
वार्यावरती घेत लकेरी
भेदभाव हे विसरुन सगळे
भेदभाव हे विसरुन सगळे
आनंदाने गायिलेले
आनंदाने गायिलेले
सप्त स्वरांचे गीत रंगले सात वेगळ्या सरोवरी
वार्यावरती घेत लकेरी गात चालल्या जललहरी
वार्यावरती घेत लकेरी