Prem Aste Andhala
बोलु दे लोका हवे ते काय लोकांना कळे
आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे
आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे
प्रेम असते आंधळे
प्रेमवेडा मोर नाचे प्रेमरंगी कौतुके
पंख तितुके नेत्र होती स्वर्गही खाली झुके
प्रेमिकांचे विश्व आहे विश्वाहुनी या वेगळे
आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे
प्रेम असते आंधळे
जन्म कैलासात घेते घे उडी जी भूतळी
सागरासी अचूक मिळते ती नदी का आंधळी
सागरासी अचूक मिळते ती नदी का आंधळी
परत फिरतो ओघ का तो लोकनिंदेच्या बळे
आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे
प्रेम असते आंधळे
माझिया प्रेमांधतेला सूर्यचंद्राची दिठी
आडवे येवोत कोणी मी तुझी रे शेवटी
बंधने देहास कोटी प्राण माझे मोकळे
आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे
आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे
प्रेम असते आंधळे प्रेम असते आंधळे
प्रेम असते आंधळे