Varyache Gungunto Gaane

वाऱ्याचे गुण गुणतो गाणे मी गाणे
दरवळतो मी हलके हलके
अल्लड पाखरू होऊन येना तू येना
भिर भिरतो हलके हलके
कधी वाटे स्वप्ना प्रमाणे जग हे सुंदर आणि
स्वप्न परी होऊन तू हि यावे
रुणझुणते पैजण वाजत सुख अंगणी यावे
भासातून स्पर्शाने उमलावे
वाऱ्याचे गुण गुणतो गाणे मी गाणे
दरवळतो मी हलके हलके
अल्लड पाखरू होऊन येना तू येना
भिर भिरतो मी हलके हलके

बावरे मन हे बावरे
तुज्यात गुंतले
न कळता
विरला बंध हा रेशमी कसा
रंग हे उधळता
हूर हूर स्पर्शातली
श्वासातूनी बोलते
प्रेमाचे जाले सोहळे सुरु आता हे
अलवार बासरी हि प्रेमाची ओठावर
सुरात मन दंगले
वाऱ्याचे गुण गुणतो गाणे मी गाणे
दरवळतो मी हलके हलके
अल्लड पाखरू होऊन येना तू येना
भिर भिरतो मी हलके हलके

मी कसे सावरावे आता
मोहरून जाता श्वास हे
जुळले नाते नवे
आज माझे तुझे
मनातून बहरले
मधहोश जाले क्षण सारे
शहर्याचे हे ओढ मनाला लागे
हि खुली आता
बे धुंद जाले मन आता शहर्याने हे
वेड जीवाला लागे रे
वाऱ्याचे गुण गुणतो गाणे मी गाणे
दरवळतो मी हलके हलके
अल्लड पाखरू होऊन येना तू येना
भिर भिरतो मी हलके हलके
कधी वाटे स्वप्ना प्रमाणे जग हे सुंदर आणि
स्वप्न परी होऊन तू हि यावे
रुणझुणते पैजण वाजत सुख अंगणी यावे
भासातून स्पर्शाने उमलावे

Músicas mais populares de अजित परब

Outros artistas de Film score