Giridhar Gopal Ek
Mangesh Padgaonkar, Sanjeevani Bhelande
गिरिधर गोपाळ एक
कुणी न दुजे माझे
तोच पति मोर मुकुट
ज्या शिरी विराजे
काय करिल कोण मला
कुलरीति कुठली
संतांच्या संगतीत
लोकलाज सुटली
आंसू शिंपून उभी
प्रेमवेल केली
आनंदच फळ होई
वेल लवून गेली
भक्त बघुन हसले मी
रडले जग दिसता
मीरा हरीची दासी
तार मला आता