Tu Ahes Na Anthem

तू आहेस ना
तू आहेस ना
नभाचा भरोसा जसा
तसा हा दिलासा तुझा
तरी एकदा सांग ना
आहेस ना
कधी शारदा तू
कधी लक्षुमी तू
कधी भाविनी वा
कधी रागिणी
सहस्त्रावधी
सूर्य झुकतात जेथे
स्वयंभू अशी
दिव्य सौदामिनी
तुझ्यावाचुनी शून्य
अवघे चराचर
अशी सर्व्यव्यापी
तुझी चेतना
तुझी थोरवी
काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना
तू आहेस ना
तू आहेस ना तू आहेस ना

अहोभाग्य अमुचे
तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली
जरा सार्थता
अहोभाग्य अमुचे
तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली
जरा सार्थता
तुला फक्त तू
जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी
वांझ पुरुषार्थ व्हा
तुला फक्त तू
जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ व्हा
तू आहेस ना
तू आहेस ना
तू आहेस ना आहेस ना
तू आहेस ना आहेस ना
तू आहेस ना आहेस ना
तू आहेस ना आहेस ना
तू आहेस ना आहेस ना

Músicas mais populares de संजीव अभयंकर

Outros artistas de