Ritya
Kshitij Patavardhan
रित्या
साऱ्या दिशा
डोळ्यात या काजळल्या
रित्या
साऱ्या दिशा
वाटा आता कोसळल्या
बरसते रात आत-आत खोल
मुक्याने एकटे
हरवली साथ मोडलेला खेळ
कुणी ना सोबती
आता थकलेल्या जीवा मिळू दे आसरा
साऱ्या दुखऱ्या या तणांचा विझवू दे दिवा
घेऊ दे ना उशाशी
चंद्र अन चांदण्या
अंथरुण शांतता
मिटू दे ना पुन्हा
आता पुन्हा-पुन्हा
आता पुन्हा
अंधार हा पांघरला
रित्या
साऱ्या दिशा
डोळ्यात या काजळल्या
बरसते रात आत-आत खोल
मुक्याने एकटे
हरवली साथ अन मोडलेला खेळ
कुणी ना सोबती