Vallav Re Nakhwa

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पिवली गो नेसलंय अंजिरी सारी
आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पिवली गो नेसलंय अंजिरी सारी
माज्या केसान् गो मालीला फुलैला चाफा
वास परमाळता वार्‍यान घेतय झेपा
नथ नाकान साजिरवानी
गला भरून सोन्याचे मनी
नथ नाकान साजिरवानी
गला भरून सोन्याचे मनी
कोलीवार्‍याची मी गो रानी
रात पुनवेला नाचून करतय मौजा
रात पुनवेला नाचून करतय मौजा
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा

या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा लाटा लाटा लाटा लाटा
या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा लाटा लाटा लाटा लाटा
कवा उदानवारा शिराला येतय फारू
कवा पान्यासुनी आभाला भिडतंय तारू
कवा पान्यासुनी आभाला भिडतंय तारू
वाट बगुन झुरते पिरती
मंग दर्याला येते भरती
वाट बगुन झुरते पिरती
मंग दर्याला येते भरती
जाते पान्यानं भिजुन धरती
येते भेटाया तसाच भरतार माझा
येते भेटाया तसाच भरतार माझा
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा

Músicas mais populares de प्राजक्ता शुक्रे

Outros artistas de Film score