Dev Pahila

Vaibhav Deshmukh

हे आला डोळ्यात उजेड
झाली मनात पहाट
आज घावली घावली
पावलांना नवी वाट

हे उधळलं काळजात
रंग आनंदाचं दाट
उधळलं काळजात
रंग आनंदाचं दाट
आज हासऱ्या गंधान
वारा वाहतो भन्नाट

मन आतुर आतुर
घेणा सपनाची गाठ
ओढ लागलीया गोड
पाय चालली जोमात
आ आ आ आ आ आ
डोळ्यात उजेड झाली
झाली मनात पहाट
आज घावली घावली
पावलांना नवी वाट

सुख दूर पळणार
कस आलया जवळ
कस इवल्या मुठीत
आज मावल आभाळ

हाकू लागला अंधार
आज दिव उमलून
कसा मनात आनंद
वाही दुथडी भरून
तुझ्या डोळ्या मध्ये चंद्र
मन भरून हासला
तुझ्या डोळ्या मध्ये चंद्र
मन भरून हासला
आज माझ्या मंदी माझा मी
विठ्ठल पाहिला मी
विठ्ठल पाहिला मी
विठ्ठल पाहिला

Músicas mais populares de अजय गोगवले

Outros artistas de Film score