Pahate Pahate Mala Jag Aali
Suresh Bhat
पहाटे पहाटे मला जाग झाली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
पहाटे पहाटे
मला आठवेना तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
मला आठवेना तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरी ही नभाला पुरेशी ना लाली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
पहाटे पहाटे
कसा रामपारी सुटे गार वारा
कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू वारा
लपेटून घे तू मला भोवताली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
पहाटे पहाटे
तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
आता राहूदे बोलणे हालचाली
आता राहूदे बोलणे हालचाली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
पहाटे पहाटे मला जाग आले
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
पहाटे पहाटे हं हं हं हं