Jeevlaga
जीवलगा खिन्न का का हे
जीवलगा खिन्न का का हे
काळाचे चक्र फिरेल
काळाचे चक्र फिरेल संपेल रात्र संपेल
जीवलगा खिन्न का का हे
काळाचे चक्र फिरेल
काळाचे चक्र फिरेल संपेल रात्र संपेल
जीवलगा खिन्न का का हे
जाळीत दिशांना वाहे जणू काळोखाचा लाव्हा
जाळीत दिशांना वाहे जणू काळोखाचा लाव्हा
अंधार सागराला या जणू कोठे पैल नसावा
गाभ्यात परी तिमिराच्या
गाभ्यात परी तिमिराच्या तेजाचा कोंब फुटेल
संपेल रात्र संपेल
जीवलगा खिन्न का का हे
काळाचे चक्र फिरेल
काळाचे चक्र फिरेल संपेल रात्र संपेल
जीवलगा खिन्न का का हे
घर सोडून जाता पक्षी वठलेला उरतो माळ
घर सोडून जाता पक्षी वठलेला उरतो माळ
कंगाल पोरकी झाडे वर रीते रीते आभाळ
परी ओसाडीतून हिरवे
परी ओसाडीतून हिरवे चाहूल पुन्हा उगवेल
संपेल शिशिर संपेल
जीवलगा खिन्न का का हे
ऋतु रंग पुन्हा बदलेल
ऋतु रंग पुन्हा बदलेल संपेल शिशिर संपेल
जीवलगा खिन्न का का हे
संकटे ना अपुल्या हाती सोसणे आपुले काम
संकटे ना अपुल्या हाती सोसणे आपुले काम
प्रितीच होई आधार प्रितीच खरा विश्राम
स्वर जागा होईल फिरुनी
स्वर जागा होईल फिरुनी मन पुन्हा नवे होईल
प्रीतीची साथ असेल
जीवलगा खिन्न का का हे
प्रीतीची साथ असेल
प्रीतीची साथ असेल
संपेल रात्र संपेल
जीवलगा खिन्न का का हे