Sutrane Uddane Hanumana Chi Aarti
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी
जय देव जय देव जय श्री हनुमंता
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्री हनुमंता
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता
जय देव जय देव
दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द
थरथरला धरणीधर मानीला खेद
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद
रामीं रामदासा शक्तीचा बोध
जय देव जय देव जय श्री हनुमंता
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता
जय देव जय देव
जय देव जय देव जय श्री हनुमंता
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता
जय देव जय देव